
देवगड : देवगड मोंडपार अनभवणेवाडी येथे वाहनाला साईड देताना बसला अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना एसटी रस्त्यानजीक घसरली आहे यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.विद्यार्थी व प्रवासी सुखरूप आहेत . या रस्त्यानजीक सुमारे ५० फूट खोल दरी असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला. या एसटीतील विद्यार्थी व प्रवाशांना एसटीच्या संकटकालीन मार्गाने (दरवाजाने) एसटीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली.स्थानिक ग्रामस्थ मदतकार्यात सहभागी झाले होते.या रस्त्यानजीक सुमारे ५० फूटाची खोल दरी असून तेथे संरक्षक भिंत व्हावी, अशी मागणी या प्रसंगा नंतर ग्रामस्थांकडून होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड एसटी स्थानकातून देवगड- तळेबाजार- वानिवडेमार्गे मोंड ही बसफेरी सकाळी ८ वा. सुटते. या एसटी बसफेरीचा लाभ शालेय विद्यार्थी घेत असतात. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर बुधवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मोंड एसटीतून प्रवाशांसह विद्यार्थीही प्रवास करीत होते.ही एसटी मोंडपार अनभवणेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेनजीकच्या अरुंद वळणावर आली असता समोरून आलेल्या वाहनाला साईड देत असताना एसटी रस्त्यानजीक घसरली. चालकाने प – सांवधान राखून एसटी नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांसह एसटीतील प्रवाशांना एसटीच्या संकटकालीन मार्गाने (दरवाजा) एसटीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.