अभाविपच्या कोंकण प्रांत अधिवेशनास प्रारंभ

▪️ धर्मासाठी घेतलेल्य केसेसचा मला अभिमान : मंत्री नितेश राणे ▪️ बांगलादेशी, रोहिंग्यांना गर्भीत इशारा
Edited by:
Published on: December 27, 2024 14:25 PM
views 268  views

सावंतवाडी : हिंदू राष्ट्राला विकसित करण्यासह राष्ट्र सुरक्षित ठेवणंही तेवढंच आवश्यक आहे. आपली ती जबाबदारी आहे. बांग्लादेशी, रोहींग्यो मुसलमान आपल्या किनारपट्टीवर मस्ती करू पाहत आहेत. या खात्याचा मंत्री म्हणून त्यांची मस्ती खपवून घेणार नाही. माझ्यावर हिंदूत्वासाठी कार्य करताना ३८ केसेस झाल्यात. धर्मासाठी घेतलेल्या या केसेसचा मला अभिमान आहे असं विधान मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केल. तसेच विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे‌. या संघटनेनं देशाला नेतृत्व करणारे नेते दिलेत. त्यामुळे देशाच्या अन् हिंदूंच्या विरोधात असणाऱ्यांच्या आडवं जाण गरजेचे आहे. तो कडवटपणा आपल्यात असलाच पाहिजे. तरच, देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पहाणार नाही असं मत मंत्री राणे यांनी व्यक्त केल. सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रांत अधिवेशनावेळी ते बोलत होते. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांताच्या ५९ व्या कोंकण प्रांत अधिवेशनाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सिटी येथे प्रारंभ झाला. याच उद्घाटन प्रा.डॉ.मनिष जोशी यांच्या हस्ते व मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे  प्रा. डॉ. मनिष जोशी, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल रजोरीआ, सावंतवाडी शहराध्यक्ष डॉ. साईनाथ सितावार, शहरमंत्री स्नेहा धोटे आदी उपस्थित होते. पुढील दोन दिवस हे अधिवेशन होणार असून कोकण प्रांतातील एक हजार विद्यार्थी याला उपस्थित आहेत. 

दरम्यान, या अधिवेशनात मार्गदर्शन करताना मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, मंत्री नितेश राणे म्हणाले, समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता भगव कोकण असं मी म्हणेन. हिंदुराष्ट्रात आपण काम करतो.  राष्ट्र प्रथम आपण मानतो‌. या राष्ट्राला विकसित करण्यासह सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. आपली ती जबाबदारी आहे हे स्वीकारून वागलं पाहिजे. आपल्या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारे डोळे, त्या आव्हानाला कसं सामोर जायच ? हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे‌. त्यादृष्टीने कार्य केलं पाहिजे. बांग्लादेशी, रोहींग्यो मुसलमान आपल्या भागात येत आहेत. किनारपट्टीवर मस्ती करू पहात आहे. या खात्याचा मंत्री झाल्यावर मी संपूर्ण किनारपट्टीचा सर्वे करायला सांगितला आहे. किनारपट्टीवर कोण मस्ती करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. विकास अन् निधी देण्यासह माझं राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी माझा प्रयत्न आहे‌.‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर काही हे राष्ट्र इस्लाम राष्ट्र करण्याचा डाव आखत आहे‌. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे असं मत  राणेंनी व्यक्त केल. तसेच विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे‌. या संघटनेने देशाला नेतृत्व करणारे नेते दिले आहेत. तो इतिहास जपला पाहिजे. माझ्यावर हिंदूत्वासाठी कार्य करताना ३८ केसेस झाल्यात. धर्मासाठी घेतलेल्या केसेसचा मला अभिमान आहे. देशाच्या अन् हिंदूंच्या विरोधात असणाऱ्यांच्या आडवं जाण गरजेचे आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आक्रमणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्यात तो कडवटपणा असा पाहिजे. तरच आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पहाणार नाही. दहशत माजवायची हिंमत कोणी करणार नाही. या अधिवेशनात पुढे जात असताना हिंदूराष्ट्राला तुमची मदत होईल अशी भुमिका घेऊन जा, आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांदे लावून उभे आहोत असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त करत अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिषदेच कौतुक केले.

अधिवेशनाचे उद्घाटक प्रा. डॉ. मनिष जोशी म्हणाले, विकसित कोकणासह सुरक्षित कोकण हे आव्हान देखील आपल्या पुढे आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच मोठा संघर्ष केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून माझ्यासारख्याला कोकणची ओळख झाली. विकसित देशात विद्यार्थी परिषदेच योगदान फार मोठे आहे. नव्या शैक्षणिक धोरणासाठी या परिषदेन मेहनत घेतली आहे‌. युजीसीच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्ट्या विकसित व्हा, २०४७ ला भारत सुरक्षित, विकसित असला पाहिजे. यासह सर्वांगीणदृष्ट्या विकासित राष्ट्र असाव यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी  केलं.

प्रास्ताविक स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर यांनी केले. अधिवेशनाचे सुत्रसंचालन स्नेहा धोटे, आभार साईनाथ सितावार यांनी मानले. याप्रसंगीयुवराज लखमराजे भोंसले, प्रभाकर सावंत,कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, महेश सारंग, सुधीर आडीवरेकर, अन्नपूर्णा कोरगावर, उदय नाईक, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, ऐश्वर्या कोरगावकर, डॉ. प्रसाद देवधर, अॅड. सुषमा खानोलकर, डॉ. राजशेखर कार्लेकर,  प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई,व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर आदी उपस्थित होते.