अभाविपची सावंतवाडीत भव्य शोभायात्रा

Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2024 18:21 PM
views 59  views

सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांताचं ५९ वं कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत होत आहे‌. यानिमित्ताने भव्य शोभायात्रा मिरवणूक शहरातून काढण्यात आली. कोकण प्रांतातील जिल्ह्यांसह गोवा येथील विद्यार्थ्यी यात सहभागी झाले होते. शहरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला. कोकण प्रांतातील जिल्ह्यांसह गोवा येथील विद्यार्थ्यी यात सहभागी झाले होते. ढोल पथकांच्या जयघोषासह जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या शोभायात्रेत युवराज लखमराजे भोंसले, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल रजोरीआ, सावंतवाडी शहराध्यक्ष डॉ. साईनाथ सितावार, शहरमंत्री स्नेहा धोटे, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,  प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई,व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, सुधीर आडीवरेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, डॉ. राजशेखर कार्लेकर, अँड. संजू शिरोडकर, दिलीप भालेकर आदींसह शेकडो जण शोभायात्रेत सहभागी झाले होते. यानंतर गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली.