
दापोली : समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरगंजेबाचे उदात्तिकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी दापोलीतील शिवभक्तांनी दापोली तहसिलदार यांना एक निवेदन देऊन त्यांनी निषेध व्यक्त केला.
दापोलीतील शिवभक्त हे बुधवार दि. 5 मार्च रोजी सकाळी शिवपुतळ्याजवळ एकत्र जमले. याठिकाणी त्यांनी अबु आझमी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच यानंतर दापोलीच्या तहसिल कार्यालयात जाऊन तहसिलदार अर्चना बोंबे - घोलप यांना एक निवेदन सादर केले. यावेळी दापोली सह तालुक्यातील अनेक शिवभक्त उपस्थित होते.