पदवीधर नोंदणीसाठी 'त्या' अटी रद्द करा : अॅड. नकुल पार्सेकर

Edited by: विनायक गावस
Published on: October 11, 2023 16:48 PM
views 175  views

सावंतवाडी : पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रासह संबंधित नोंदणी करणाऱ्या अर्ज सादर केले. त्यात दोन ञुटी काढल्या ज्या मतदार नोंदणी करणाऱ्यांसाठी डोकेदुखी आहेत. पदवीधर नोंदणीसाठी असणाऱ्या या विचित्र अटी रद्द करा अशी मागणी अँड नकुल पार्सेकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, नोंदणी नमुना १८ वर रंगीत पासपोर्ट आकाराचा  फोटो लावलेला आहे. तो चालणार नाही. कारण, त्यांना फोटोची पार्श्वभूमी ही पांढऱ्या रंगाचीच पाहिजे. फोटो स्पष्ट दिसणारा हवा ही अट मान्य मात्र पांढरी पार्श्वभूमीच हवी हा निव्वळ विचित्रपणा आहे. अनेकांकडे रंगीत पार्श्वभूमी असलेलेच पासपोर्ट आकाराचे फोटो असतात. दुसरी ञुटी ही काढली की जे सोबत आवश्यक कागदपत्र जोडलेली आहेत ती कोकण पदवीधर निवडणूकीचे निवडणूक अधिकारी तथा कोकण आयुक्त यानी निर्धारित केलेले प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी किंवा मुख्याधिकारी यांनी  साक्षांकित केले पाहिजे. स्वयं साक्षांकित केलेल्या कागदपत्राना सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिलेली असताना पुन्हा अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करण्याचे बंधन का ?

याबाबत सावंतवाडीचे तहसीलदार पाटील यांना भेटलो तेव्हा त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यानी सांगितले की हे निवडणूक आयोगाचेच निर्णय आहेत. जेव्हा कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व हा विषय सांगितला तेव्हा त्यांनी चार दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाशी याबाबत बोलणी झालेली असून याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले आहे अस अँड. पार्सेकर म्हणाले.

दोन्ही फाॅर्म स्विकारले. मात्र  दिलेल्या पावतीवर" फोटोची पार्श्वभूमी पांढऱ्या रंगाची नाही. परंतु शासनाने सक्तीचे केल्यास तसा फोटो सादर करावा असा शेरा मारलेला आहे. जर पदवीधर मतदारांंची नोंदणी वाढली पाहिजे तर या अशा विचित्र अटी शिथिल कराव्यात. बोगस नोंदणी होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केल.