
कणकवली : सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्षुमी व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिव्हील सर्जन डॉ. श्रीपाद पाटिल यांची सदीछ भेट घेतली व जिल्ह्यातील जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्या संदर्भात चर्चा केली.
त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सिव्हील सर्जन यांनी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुरेश गवस, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावळाराम अणावकर गुरूजी, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य उदय भोसले, कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावस्कर, सुनील भोगटे, माजीराष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी उपसभापति आर के सावंत, माजी उपासभापति नाथा मालंडकार,राष्ट्रवादी अल्पसंख्यक प्रदेश महासचिव शफीक खान, असलम ख़ातिब, शैलेश लाड, राजू धारपवार, व्ही. जे. एन टी जिल्हा अध्यक्ष अशोक पवार आदि उपस्थित होते.