अजित पवारांची अबिद नाईकांनी घेतली भेट ; दिल्या खास शुभेच्छा

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 05, 2023 13:47 PM
views 375  views

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांची मुंबई देवगिरी बंगला येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी नेते तथा माजी नगरसेवक अबिद नाईक  यांनी अभिनंदन केलय.

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य उदय भोसले, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत, राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, कणकवली राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस गणेश चौगुले, राष्ट्रवादी माजी  जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी कणकवली माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,विलास पावसकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीक खान, केदार खोत, प्रवीण मोर्ये, आदि उपस्थित होते.