
सावंतवाडी : संस्थान गंजीफा ही हस्तकला प्रसिद्ध असून नुकतेच भारतीय डाक विभागाने या हस्तकलेला आपल्या टपाल तिकिटावर स्थान देऊन, सावंतवाडीच्या या हस्तकलेचा अनोखा सन्मान केला. ही हस्तकला टिकवण्यात आणि प्रसार करण्यात सावंतवाडीच्या राजपरिवाराचा सिंहाचा वाटा आहे.
अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने सावंतवाडी संस्थांनाला मिळालेल्या या सन्मानाचे औचित्य साधून युवराज लखमराजे भोंसले आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचे अभिनंदन केले. यावेळी युवराज लखमराजे यांनी अभिनव फाउंडेशन च्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात कोल्हापूर खंडपीठाकडे चालू असलेल्या जनहित याचिकेबाबत माहिती जाणून घेतली. यासंदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन ही दिले. यावेळी अभिनवचे किशोर चिटणीस, अण्णा म्हापसेकर, जितेंद्र मोरजकर, राजू केळुसकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, तुषार विचारे उपस्थित होते.










