
कणकवली : कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला रिंग रोड साठी जिल्हा कोष्टी समाजसेवा संघाचे अध्यक्ष किशोर भाई मुसळे व एक मुखी ठराव घेऊन जमीन देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्व सभासदांचे नगरसेवक अभिजीत मुसळे यांनी आभार मानले आहेत.
चौंडेश्वरी मंदिर परिसरातील गणपती मंदिर हॉल विहीर तसेच बुचडे, नेरले, चिकोडी यांनी आपली घरे काढली व राणे, देसाई,सावंत, उचले यांनी आपली जमीन रस्त्यासाठी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील आपण ऋणी असल्याचे सांगत रस्ते हे काळाची गरज असल्याने प्रत्येक व्यक्तीने नगरपंचायतीला असेच सहकार्य केले तर नगरपंचायतीचा विकास होऊ शकतो असे आज कोष्टी समाजाने दाखवून दिले आहे.त्यामुळे
भविष्यातही कणकवलीच्या विकासासाठी जनतेने असेच सहकार्य करावे त्यांना देखील आपण अशाच पद्धतीने नगरपंचायतच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य केले जाईल असे देखील नगरसेवक अभिजीत मुसळे यांनी सांगितले आहे.
नगरपंचायत प्रशासनाने जमीन मालक घर मालक आणि कोष्टी समाजसेवा संस्थेला जमीन व घर यांचा लवकरात लवकर योग्य मोबदला मिळवून दिला त्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,मुख्याधिकारी अवधूत तावडे, सर्व नगरसेवक आणि नगरपंचायत प्रशासनाचे देखील मुसळे यांनी आभार मानले आहेत.