अबब..! | योगेश कदमांकडे एवढी आहे संपत्ती

Edited by: मनोज पवार
Published on: October 25, 2024 13:02 PM
views 1052  views

दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघात दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होणार महायुतीचे व शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांनी काल (ता.२४) रोजी या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. योगेश कदम यांच्या मालकीची ७ कोटी रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ कोटी ६० लाख ९९ हजार रुपये मुलांच्या नावे ३९ लाख ७० हजार ६६ रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे यात रोख रुपये ८ लाख ९९ हजार बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक ३ कोटी ६९ लाख ८१९ रुपये असून ३३ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने आहेत. १ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये किमतीचे दागिने असून कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता १४ कोटी १  लाख ५ हजार ४२१  इतकी आहे. 

आ. योगेश कदम यांच्या नावे शेतजमीन, बिगरशेतजमीन, व्यावसाईक व निवासी अश्या स्थावर  मालमत्तेची एकूण किंमत ४१  कोटी ९८  लाख २८  हजार इतकी आहे. कदम व त्यांच्या कुटुंबियांनी  १५ कोटी ७० लाख ३३ हजार इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले आहे. 

आ. योगेश कदम  यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरण पत्रात ८३ लाख ९६ हजार २६० इतके उत्पन्न दाखविले असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न १८ लाख ७९ हजार ३८० इतके आहे. 

आ. योगेश कदम यांनी आपण  शेती, सल्लागार आणि भूविकासक असे व्यवसाय करत असून पत्नी सिनेमा निर्माता आहे. आ. योगेश कदम हे तामिळनाडू राज्यातील अलगप्पा विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी २०१७ मध्ये बी.कॉम हि पदवी मिळवली असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

५ वर्षांमध्ये आ. योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत ४ कोटी ६३ लाख, स्थावर मालमत्तेत ३९ कोटी ३१ लाख रुपयांची तर कर्जातही ११ कोटी ५२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.