तालुका एसटी कामगार सेनेच्या तालुकाप्रमुखपदी आबा सावंत

Edited by: विनायक गावस
Published on: January 09, 2024 17:25 PM
views 197  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार उबाठा संघटनेच्या सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी माजगाव माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटी संचालक तथा उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख आबा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी उबाठा सेनेचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड  जाहीर केली. आबा सावंत हे सर्वांना एकत्रितपणे घेऊन संघटनेचे काम प्रामाणिकपणे करून संघटनेला उभारी देण्याचे काम नेहमीच करतात आणि त्यांच्या जवळ संघटन कौशल्य असल्याने एसटी कामगार संघटनेला नक्कीच उभारी देऊन एसटी चालक वाहक कर्मचारी यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देतील यात शंका नाही असं मत जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर समन्वयक बाळा गावडे यांनी संघटनात्मक संरचना यावर मार्गदर्शन केले व खासदार  विनायक राऊत  यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकत्रित काम करून एसटी कामगार संघटनेच्या कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याचे काम करून संघटना मजबूत करून वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.

तर आबा सावंत यांनी आपण पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिकपणे काम करून एसटी कामगार संघटनेच्या कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवून न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन अस मत व्यक्त केले. यावेळी अमित आडके यांची आगार अध्यक्षपदी निवड केली. यावेळी एसटी कामगार संघटनेचे जिल्हा सचिव आबा धुरी, विनोद ठाकूर व एसटी कामगार संघटनेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. अनेक चालक-वाहक कर्मचारी यांनी उबाठा सेनेच्या कामगार संघटनेमध्ये प्रवेश केला.