५० खोक्यांचा देखावा उभारत आरती करणार : अमित सामंत गद्दार आमदारांचा करणार राष्ट्रवादी निषेध !

Edited by: विनायक गावस
Published on: June 19, 2023 20:01 PM
views 113  views

सावंतवाडी : गेल्यावर्षी २० जून रोजी ४० आमदारांनी महाविकास आघाडीच्या पाठित खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंचा पाठीत खंजीर खुपसून हे गुवाहाटीला निघून गेले. महाराष्ट्रातील लोकशाहीतला हा काळा दिवस आहे. हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा करायच आम्ही ठरवलेल आहे. उद्या सकाळी कुडाळला ५० खोक्यांचा देखावा तयार करून त्याची आरती केली जाणार आहे अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे  दिली.

यातील एक व्यक्ती शिक्षणमंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. सावंतवाडीच्या जनतेन त्यांच्यावर विश्वास टाकला होता. त्यांचा घात केसरकरांनी केला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत केसरकर यांनी विश्वसघात केला. आज ते नारायण राणेंना जवळ करत आहेत. अशा केसरकरांचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्या गद्दार दिन पाळुन करत आहे असं मत अमित सामंत यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास अर्चना घारे-परब या उमेदवार असतील. खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडी म्हणून घेतलेल्या भुमिकेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सावंतवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यानं या ठिकाणी आमचा दावा असणार आहे. कुडाळ व कणकवली विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेचा मागे उभी राहिल अशी माहिती सामंत यांनी दिली.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुकाध्यक्ष  जावेद शेख, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष युक्तिकार राजगुरू, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.