
सावंतवाडी : आरोस पं. वि. वि. मंडळ, आरोस संचलित आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२२-२३ या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. यावेळी जो मान शाळा व सर्व शिक्षकवृंद यांनी दिला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे मनापासून आभार मानते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थींनीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते पार पडला. वर्षभरात विशेष नैपुण्य, गुणात्मक व कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत सन्मान चिन्हाने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत अर्चना घारेंनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक अन्वर अब्दुल रझाक खान, महेंद्र पेडणेकर, रोहिदास सावंत, निलेश परब, राजन नाईक, विद्याधर देसाई, नारायण मुळीक, श्रद्धा मुळीक, यश खोत, मदन खोत तसेच संस्थेचे सदस्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित होते.