
सावंतवाडी : सातुळी - बावळाट येथील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. साहिल उर्फ सगुण जनार्दन राऊळ असे युवकाचे नाव आहे.
दरम्यान उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती पण मृतदेह पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे बाबल अल्मेडा पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.