रक्ताशी बांधिलकी असणारे युवक

Edited by: विनायक गांवस
Published on: September 02, 2024 14:31 PM
views 166  views

सावंतवाडी : बांदा येथील रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या ५ रक्तपिशवींची आवश्यकता होती. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे प्रभाकर वडार,अनिकेत सावंत, ज्ञानेश्वर राणे, अक्षय पंडीत,अमिर खान यांनी सावंतवाडीतून गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले.

गेली ८ वर्षे गोवा बांबोळी येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून दिले जात आहे. बांदा येथील एका रुग्णाला गोवा बांबोळी येथील रुग्णालयमध्ये हृदयाच्या ऑपरेशन दरम्यान ओ- पॉझिटिव्ह या रक्त गटाच्या ५ रक्त पिशवींची अत्यंत तातडीची आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे प्रभाकर वडार, अनिकेत सावंत, ज्ञानेश्वर राणे, अक्षय पंडीत, अमिर खान यांनी सावंतवाडी येथून गोवा - बांबोळी रुग्णालयमध्ये जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करता आली. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. रूग्णांच्या नातेवाईकांकडून युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानण्यात आले.