
कणकवली : फोंडाघाट येथील प्रमोद रविंद्र भोगटे (५२) यांचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची खबर देवीदास भोगटे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद भोगटे हे १८ नोव्हेंबर रोजी घराशेजारील झाडावरील फुले काढत असताना दगडावरून पाय घसरून खाली पडले. त्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.











