सडलेल्या अवस्थेत ओहोळात सापडला महिलेचा मृतदेह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 06, 2023 15:28 PM
views 596  views

देवगड  : देवगड बापर्डे येथील सुमारे १५ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी डोकांबा ओहोळात सापडला. प्रतिभा प्रकाश दुसणकर(55) असे सदर महिलेचे नाव असून, बापर्डे हेदाडवाडी येथील या महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती, अशी माहिती आहे.

या अवस्थेतच २२जुलै रोजी सकाळी ७.३० वा च्या सुमारास ती घराकडून बाहेर गेली. तिचा मुलगा बाळकृष्ण याने इकडे तिकडे सर्वत्र बघितले. परंतु त्याच्या आईचा कुठेच शोध न लागल्या मुळे त्याने देवगड पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली. रविवारी सकाळी बाळकृष्ण त्याच्या आई चा कुठे शोध लागतो का हे पाहण्यासाठी कुजलेल्याचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी डोकांबा ओहोळाच्या  दिशेकडे गेला असता कुजल्या अवस्थेत पाण्यात महिलेचा मृतदेह दिसून आला. तो त्याच्या बेपत्ता आईचाच मृत देह असल्याची ओळख पटली.

याबाबत देवगड पोलिसात कळविल्यानंतर पाेलिस हवालदार राजन जाधव आणि पाेलिस कर्मचारी यांनी घटना स्थळी जावून सडलेल्याअवस्थेत पाण्यातअसलेल्या मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढत पंचनामा केला व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.