कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 07, 2023 10:58 AM
views 529  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला वाहून गेली असून पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. प्रचिती प्रशांत कुडतरकर (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. 

ही दुर्घटना 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. मृत प्रचिती हीचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.