झोळंबेत शेतविहिरीत पडून महिलेचा मृत्यू

Edited by:
Published on: January 27, 2025 18:06 PM
views 592  views

दोडामार्ग : तालुक्यातील तळकट येथील मानसी मनोहर देसाई ( वय - ३८) या महिलेचा झोळंबे येथील शेतविहिरीत तोल जाऊन पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली याबाबत दोडामार्ग पोलिसात आकस्मित मृत्युंची नोद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशिकी तळकट येथील मानसी मनोहर देसाई हिने झोळंबे व तळकट सीमेवर नारळ व सुपारी बागयत भाडेतत्वावर घेतली होती. त्या बागयतीत मानसी ही नेहमी प्रमाणे एकटीच सुपारी गोळा व बागायतीला पाणी लावण्यासाठी गेली होती. यावेळी बागायतीतील शेत विहिरी जवळ ती काही काम करण्यासाठी गेली असता तिचा तोल जाऊन ती त्या विहित पडली व गुदमरून तिचा मृत्यू झाला.  

मानसी हिचा पती गोव्यातील एका स्कुल बसवर कामाला आहे. तो घरी आला असता त्याला आपली पत्नी घरी दिसली नाही. यावेळी त्याने शोध घेतला, मात्र, ती कुठेच दिसली नाही. यावेळी ती बागायतीत तर गेली नाही ना याची शेजारी चौकशी केली.  त्यावेळी ती बागयतिच्या दिशेने जाताना एकाला दिसली होती. त्यावेळी तिच्या पतिने त्या बागयतीत शोध घेतला,  त्यावेळी ती शेतविहिरीत मृत असल्याची निदर्शनास आली. यावेळी दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली असता घटना स्थळी पोलीस दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.