मंत्री दीपक केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर भरगच्च कार्यक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: July 15, 2023 19:28 PM
views 89  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या ६८ वाढदिवसानिमित्त भरगच्च उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, सामाजिक व आरोग्य विषयक कार्यक्रम दि.१७ ते २३ जुलै पर्यंत होणार आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दि.२३ जुलै रोजी दीपकभाई केसरकर स्विकारणार आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी दिली.

यावेळी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, गजानन नाटेकर,भारती मोरे, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, आदी उपस्थित होते.

 सोमवार दि.१७ जुलै रोजी साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास केंद्र सावंतवाडी येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. लोकमान्य ऑर्थोपेडिक हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प गुडघेदुखी सांधेदुखी पाठ दुखी कंबर दुखी, लिंगामेट आधी होईल हा कॅम्प,शिरोडा, दोडामार्ग, साटेली भेडशी व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील केंद्रात होणार आहे असे ते म्हणाले.

 शनिवार दि.२२ जुलै रोजी महिलांसाठी विशेष गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान व मार्गदर्शन यशराज हॉस्पिटल सावंतवाडी येथे सकाळी दहा वाजता होणार आहे असे राजेंद्र पोकळे यांनी सांगितले. महाआरोग्य शिबिर २३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे हृदयरोग मूत्र रोग संबंधी विकार पोटाचे विकार मेंदू विकार किडनी विकार जनरल मेडिसिन अरिहंत हॉस्पिटल बेळगाव यांच्यामार्फत होत आहेत. या दिवशी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. सोमवारपासून अधिवेशन असल्यामुळे ते वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपस्थित राहणार नसल्याचे ते म्हणाले.

 मंगळवार दि.१८ जुलै रोजी शिवसेना जिल्हा युवती संघटना व जिल्हा महिला संघटनेमार्फत किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम सावंतवाडी शहरातील शाळांमधील सर्व मुलींसाठी आयोजित करण्यात आला आहे सावंतवाडी शहरातील शालेय मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप होईल मतदारसंघातील सर्व माध्यमिक शालेय मुला-मुलींना आरोग्य विषय मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप तसे मुलींना चे मार्गदर्शन होणार आहे. बुधवार दि. १९ जुलै रोजी मराठी भाषा विकास या कार्यक्रम अंतर्गत शालेय मुलांसाठी हस्ताक्षर वर्गाच्या आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शक हस्ताक्षर तज्ञ विकास गोवेकर व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन भरत गावडे माजगाव हायस्कूलमध्ये सकाळी ११ वाजता  तर माडखोल शाळेमध्ये दुपारी ३ वाजता मार्गदर्शन करणार आहेत.

 शुक्रवार दि.२१ जुलै रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक सावंतवाडी तालुक्यात ७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र भेटू देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शंभर टक्के निकाल असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शाळांत परीक्षेत मराठी विषयात उच्चतम म्हणजे ९८ ते ९९ जिल्ह्यातील  यशवंत मुलांचे प्रमाणपत्र भेट देऊन काझी शहा उद्दीन हॉल येथे सकाळी अकरा वाजता सन्मान करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

 जीवन संजीवनी ट्रस्ट व आनंदाश्रम आणाव सविता आश्रम पेंडूर या संस्थांना वैद्यकीय साहित्य देण्यात येणार आहेत सावंतवाडी शहरातील शिवसेना युवा संघटनेमार्फत शालेय मुलांसाठी इनडोअर क्रीडा महोत्सव कॅरम टेबल टेनिस बुद्धिबळ बॅडमिंटन जिमखाना मैदान सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहेत जिल्ह्यातील महिलांना १००० मिरी रोप वाटप जिल्हा महिला अध्यक्षा अँड नीता सावंत यांच्या माध्यमातून होणार आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या सहकाऱ्यांनी व  ज्येष्ठांसाठी कान नाक घसा डोळ्याबाबत डॉ. श्रेयस मांगलेकर यांचे मार्गदर्शन व तपासणी होणार आहे. रविवार दि.२३ जुलै रोजी ओटवणे रवळनाथ मंदिर येथे भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दोडामार्ग तालुक्यामध्ये वर्षा मॅरेथॉन स्पर्धा चार गटांमध्ये महात्मा गांधी मिशन स्कूल दोडामार्ग आई रोड येथे आहे.यासाठी हनुमान सावंत आनंद बामणीकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.

वेंगुर्ले तालुका सोमवार दि.१७ जुलै रोजी तालुक्यातील पहिल्या तीन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य फळ झाडं देऊन सन्मान करण्यात येणार आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांचा सन्मान होणार आहे फुटबॉल किंवा हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे सचिन वालावलकर यांनी सांगितले.

दोडामार्ग तालुक्यात देखील भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही दि.२३ जुलै रोजी होईल असे गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले.