शिवशौर्य यात्रेचं सावंतवाडीत जंगी स्वागत...!

Edited by: विनायक गावस
Published on: September 30, 2023 17:38 PM
views 590  views

सावंतवाडी : दोडामार्ग येथून निघालेल्या शिवशौर्य यात्रेचे जंगी स्वागत सावंतवाडी शहरात करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात सावंतवाडीकरांनी स्वागत केले.भर पावसात जय शिवाजी जय भवानी चा गजरात ही यात्रा टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय पोलीस लाईन येथून सावंतवाडी संपूर्ण बाजारपेठेतून मार्गस्थ झाली.  सावंतवाडी संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सावंतावडी शहर शिवमय झाले होते. 

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अजय गोंदावळे, पुंडलिक दळवी, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, चंद्रकांत जाधव, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, संतोष गांवस, बंटी पुरोहित बाळू देसाई मानसी धुरी, श्री.पेडणेकर यात्रा प्रमुख तथा बजरंग दल संयोजक गौरव शंकरदास धर्मप्रसार प्रमुख सुनील सावंत कोषाध्यक्ष रवी सातावळेकर सहपुरुषाध्यक्ष विनायक रांगणेकर किशोर चिटणीस विशाखा रांगणेकर सौ वझे आदी उपस्थित होते.