
मालवण : कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन आमदार वैभव नाईक यांचा प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी वैभव नाईक मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री होऊ देत असे साकडे यावेळी घालण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल परब, युवतीसेना विभाग प्रमुख सोनाली डिचवलकर ,शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर, युवासेना शाखाप्रमुख जय वस्त, महिला शाखाप्रमुख स्वाती तांडेल, युवती शाखाप्रमुख मुक्ता राजपूत, सुवर्णा भोगावकर ,महादेव हिरणवाळे , तन्मय परब ,पार्थ वस्त , गजानन मांजरेकर, अंकिता पवार आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.