दृष्टीबाधितांची अनोखी सहल

Edited by:
Published on: May 02, 2025 17:46 PM
views 86  views

चिपळूण : राष्ट्रीय अंधकल्याण असोसिएशन चिपळूण रत्नागिरी जिल्हा शाखा (नॅब चिपळूण) याची दृष्टीबाधितांची सहल चालु वर्षी नुकतीच महाबळेश्वर येथे गेली होती. यावेळी महाबळेश्वर येथील सनराइज वॅक्स म्युझियम ला भेट देण्यात आली. 

तेथे  म्युझियम चे भावेश भाटीया यांच्या वतीने  म्युझियममध्ये मेणबत्ती   बनविण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी म्युझियमचे भावेश भाटीया यांनी उपस्थित रत्नागिरी जिल्ह्यातील दृष्टीबाधितांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

यानंतर त्यांना मेणाचे पुतळे हाताच्या स्पर्शाने दाखविण्यात आले. तर शिरीषभाई गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेटक नियोजन करून महाबळेश्वर येथील निवडक पाॅईंट यांची सफर घडवून त्यांना आनंद मिळवून दिला तर नॅबचे अध्यक्ष  सुचय अण्णा रेडीज, कार्यवाह  निलेश भुरण यांनी सहभागी सर्व दृष्टीबाधितांना शुभेच्छा दिल्या. सहलीला येऊन आम्हाला आनंद झाला, असे सहभागी झालेल्या दृष्टीबाधितांंनी व्यक्त केले. सहलीचे नियोजन श्री भरत नांदगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली  संदीप नलावडे, विकास अधिकारी मयुर चव्हाण, श्री विजय घाणेकर यांनी केले.