विजयदुर्ग पोलिसांचा अनोखा उपक्रम !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 20, 2023 13:53 PM
views 209  views

देवगड : देवगड विजयदुर्ग येथे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी येतात. याच अनुषंगाने विजयदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत फणसगाव चेक पोस्ट येथे गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या अनुषंगाने जनसंवाद अंतर्गत पोलीस व नागरिक यांचे नाते दृढ होऊन पोलिसांबाबत आपुलकीची भावना वाढावी होण्याकरिता मुंबई येथून कोकणात येणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ देऊन विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांनी गणेश भक्तांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील उपस्थित होते .