
सावंतवाडी : बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारानंतर झालेल्या हत्याकांडाच्या तीव्र निषेधार्थ सावंतवाडीत श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आले असून सकल हिंदू समाजाच्या वतीने या सभेला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
बांगलादेशात केवळ हिंदू धर्मीय आहेत म्हणून धार्मिक वंशविच्छेदाच्या हेतूने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या धर्म बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ठीक सात वाजता सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरा समोर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्यावतीने या सभेला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.