
वैभववाडी : वैभववाडी - उंबर्डे मार्गावर सोनाळी येथे रस्त्यावर झाड पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सोनाळी अभिनव विद्यामंदिरनजीक रस्त्याकडेला असलेलं झाड आग लागून रस्त्यावर पडले आहे. यामुळे वैभववाडी -उंबर्डे मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या आहेत.