
दोडामार्ग : कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील नारायण सीताराम खडपकर यांच्या राहत्या घरावर काल मांगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाड पडून घराचे छप्पर पडले यावेळी घरात असलेले सीताराम खडपकर यांना किरकोळ दुखापत झाली व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशिकी मंगळवारी तालुक्यात सोसाट्याचा वारा व पासूस सुरु होता व रात्रीच्या 11 वाजण्याच्या झोपेच्या वेळी घरातील सर्व खडपकर कुटुंब झोपले होते अचानक घरा शेजारील झाड मोडून खडपकर यांच्या घरावर पडले झाड घरावर पडताच घराची कौले, रिपी, वाशे मोडून घरात पडले व घरात झोपलेल्या कुटुंबा पैकी सीताराम खडपकर यांच्या अंगावर कौले पडून किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. दैव बलवंत म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबात दोडामार्ग नगरपंचायत व महसूल विभागाला याची कल्पना देणायात आली आज बुधवारी घराचा पंचनाम करण्यात आल्याचे नगरपणाच्यायत कडून सांगण्यात आले.
याबात दोडामार्ग नगरपणांच्यातला याची कल्पना देताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आपले नगरपंचायतचे कर्मचारी खडपकर यांच्या घरावरील झाड काढण्यासाठी पाठविले व स्वतः उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी पुढाकार घेऊन स्वतः घरावरील झाड काढण्यास मदत केली.