
दोडामार्ग : दोडामार्ग विजघर मार्गावर आंबेली येथे झाड पडून 1 तास वाहतूक थप्प होती. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देऊनही बांधकाम विभाग घटना स्थळी पोहचलेच नाही. नागरिकांनी झाडाची फांदी तोडून एकेरी वाहतूक सूरु केली.
काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज शनिवारी दमदार हजेरी लावली. दोडामार्ग विजघर मार्गावर आंबेली येथे आकेशीचे झाड पडून वाहतूक बंद झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांबच रांगा लागल्या होत्या. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून देखील बांधकाम विभाग घटना स्थळी पोहचले नाही यावेळी प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत झाडाची फांदी हाताने तोडून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली.