
कणकवली : नागवे पटेलवाडी येथे सुनील सावंत यांच्या घरावर झाड कोसळले. सुदैवाने हे झाड घराच्या एका कोपऱ्यावर तसेच अंगणातील शेडवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत सावंत यांचे सुमारे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास घडली. नागवे परिसरात पाऊस आणि वादळी वारा सुटल्याने नागवे पटेलवाडी येथील सुनील सावंत यांच्या घरावर झाड कोसळले. या घटनेचा पंचानामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी श्री.सावंत यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे.