
दोडामार्ग : मेढे येथील एका अवघड वळणावर पर्यटकांची कार पलटी झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारमधील पर्यटक किरकोळ जखमी झाले. सांगली येथील काही पर्यटक मारुती सुझुकी बलेनो कारने गोव्याला जाण्यासाठी दोडामार्ग मार्गे येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मेढे येथील एका नागमोडी वळणावर कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी कार विरुद्ध बाजूला जात एका रस्ताकडेला असलेल्या छोट्याशा टेकडीवर आदळली. त्यानंतर पुढे जात पलटी झाली. अपघातात पर्यटक किरकोळ जखमी झाले असून कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.