नागपूरातील पर्यटकाचा मालवणात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 03, 2023 19:15 PM
views 96  views

मालवण : मालवणात पर्यटनासाठी आलेल्या गोपाळ सत्यनारायण मुंधडा (वय ६६) या नागपूर येथील पर्यटकाचा तारकर्ली येथील रिसॉर्टवर हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मृत गोपाळ मुंधडा यांची पत्नी संध्या गोपाळ मुंधडा यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. पर्यटनासाठी आलेले गोपाळ मुंधडा हे तारकर्ली येथील एका रिसॉर्ट वर मुक्कामास राहिले होते. काल सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्यांना रिसॉर्टवरील रूममध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेमंत पेडणेकर हे करत आहेत.