तीन वर्षीय बालकाचा ओहोळच्या पाण्यात बुडून मृत्यू

परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील दुर्घटना
Edited by:
Published on: March 02, 2025 11:57 AM
views 728  views

वेंगुर्ला :  परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु. भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा आज शनिवारी ओहोळाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथे परुळेकर यांचे घर आहे. घराला लागूनच ओहोळ आहे. या ओहोळ च्या पाण्यात घरातील मोठ्या व्यक्तींची नजर चुकून भूपेश कधी गेला हे कळलेच नाही. ओहोळातील पाणी समजले नसल्याने तो पाण्यात बुडाल्याने त्याचे दुर्दैवी निधन झाले. सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान कु. भूपेश हा घरच्यांची नजर चुकवून ओहोळ च्या दिशेने गेला आणि पाण्यात बुडाला याची कोणालाच कल्पना नव्हती. तो घरात दिसून आला नाही म्हणुन मग आसपासच्या घरांमधे घरच्यांनी शोध घेतला गेला मात्र तो तेथे दिसून आला नाही. नंतर परिसरात शोध घेतला असता तो ओहोळाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. तातडीने त्याला परूळे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनंतर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो वाचू शकला नाही. या दुर्दैवी घटना घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना शाखा प्रमुख परुळे निलेश परुळेकर यांचा तो मुलगा होता.