भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सोहम घोगळेची दमदार कामगिरी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2024 13:43 PM
views 150  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी सोहम मंगेश घोगळे याने 100 मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम आणि 50 मीटर बटरफ्लाय व 400 मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय स्थान मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. सोहमच्या दमदार कामगिरीमुळे त्याची विभागीय फेरीसाठी निवड झाली असून त्याबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.