'त्या' बॅनरची जोरदार चर्चा..!

Edited by: भरत केसरकर
Published on: November 14, 2023 10:59 AM
views 484  views

कुडाळ : राजकीय निवृत्तीनंतर चर्चेत आलेले माजी खासदार निलेश राणे हे सध्या कोकणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. यावेळी चर्चा आहे ती निलेश राणे यांच्या बॅनरची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या निलेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे एकत्रित बॅनर लावण्यात आले आहेत.

हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेत. खरंतर उदय सामंत आणि निलेश राणे यांच्यात अलीकडच्या काळात सख्य नव्हत. काही दिवसापूर्वीच निलेश राणे आणि उदय सामंत यांची रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट सुद्धा घेतली होती. आणि आता अचानक निलेश राणे उदय सामंत आणि किरण सामंत यांचे एकत्रित बॅनर लागल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरमुळे मैत्रिचा नवा अध्याय सुरू झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसह कुडाळ मालवण विधानसभेचे राजकीय चित्र बदलणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.