घरात घुसून भटक्या कुत्र्याने घेतला चावा..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 07, 2023 15:22 PM
views 1062  views

सावंतवाडी : सावंतवाडी कोलगाव येथील धुरीटेंब वाडीतील अक्षय महेश धुरी हा बालक घरातील बाहेरील खोलीत बसला असताना, भटक्या कुत्र्याने येऊन त्याच्या मांडीला चावा घेतला. त्यामुळे अक्षयच्या पायाला जखम झाली. त्याच्या वडीलांनी त्याला ताबडतोब सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेऊन इंजेक्शन, औषधे देऊन उपचार केले. या घटनेमुळे या परीसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

कुत्रा प्रेमी नागरिकांनी कुत्रा पाळत असताना तो दुसऱ्याला चावणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावेत व आर्थिक तरतूद करावी असं मत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केले आहे.