
देवगड : चहाची तलफ जीवावर बेतल्याची घटना घडली. देवगड येथील मासेमारी नौकेवरील खलाशाचा चहा करत असताना स्टोव्हचा भडका उडाला. यात एकाचा भाजून गंभीर होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
देवगड आडिवरे डोंगरवाडी येथील संजय महादेव पाटील (वय ५० )येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून कपड्याने पेट घेतला. त्या भडक्यात गंभीर भाजलेल्या संजय महादेव पाटील यांचा २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून कपड्याने पेट घेतला. या झालेल्या भडक्यात संजय महादेव पाटील आडिवरे डोंगरवाडी हे गंभीररित्या भाजले होते. त्यांना तात्काळ देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचाराकरिता ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असताना २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद दामोदर भागोजी नाटेकर रा गावडे आंबेरी यांनी देवगड पोलिस ठाण्यात दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करीत आहेत. देवगड पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.