भरधाव बाईक आदळली लोखंडी पोलावर

परप्रांतीय कामगार जखमी
Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2025 19:09 PM
views 26  views

सावंतवाडी : मोटर सायकलवरील ताबा सुटून माजगाव चर्च समोर परप्रांतीय कामगारांचा अपघात झाला. यामध्ये संबंधित कामगार गंभीर जखमी झाला. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचाराकरता गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले.

संबंधित कामगार हा आपल्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलने बांद्यावरून सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येत होता. यावेळी त्याचा मोटरसायकल वरील ताबा सुटून मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी फोलावर आदळली. यात त्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर संबंधिताला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचाराकरता त्याला गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले.