विसर्जनस्थळावरील पुष्पवृष्टी खास आकर्षण

मंत्री केसरकरांकडून विशेष व्यवस्था !
Edited by: विनायक गावस
Published on: September 21, 2023 17:03 PM
views 184  views

सावंतवाडी :  शहरातील गणरायांचे विसर्जन ऐतिहासिक मोती तलावात केलं जातं. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जातीनीशी लक्ष घालून प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली. यासह लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी या विसर्जनस्थळी शिवसेनेकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली.

कोल्हापूर येथून विशेष मशीनरी यासाठी मागविण्यात आली होती‌. यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळा लूक पहायला मिळाला. गणेश भक्तांनी या खास नियोजनासाठी मंत्री केसरकरांचे आभार मानत लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. या पुष्पवृष्टीच्या शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी सागर साळुंखे, नंदू शिरोडकर, वैभव नाटेकर, प्रतिक बांदेकर, शैलेश दळवी आदी उपस्थित होते.