
वेंगुर्ला : धूळवडीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहर, परबवाडा व उभादांडा भागात विविध रंगांची उधळण करून आज धुळवड साजरी करण्यात आली.
शनिवारी शिमगोत्साची सांगता होत असतानाच वेंगुर्ल्यात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली. दुपारनंतर ठिकठिकाणी नागरिकांनी एकत्र येत ढोल, ताशे, डिजेच्या तालावर नृत्याचा ठेका धरत जल्लोष केला. तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध रंगांची उधळण करून एकमेकांना रंग लावला.