
सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झालेले प्रमोद केरकर हे आपल्या फिरत्या भत्ते बिलांच्या रकमेसाठी गेली तीन वर्षे मागणी करत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना ती मिळालेली नाही. याबबत त्यांनी संबधित कार्यालयात विचारणा केली असता अद्याप अनुदान आलेले नाही, त्यामुळे तुमची बिले पेंडिंग असल्याच तोंडी सांगण्यात येत असल्याच त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
आपण गेली ४० वर्षे इमाने इतबारे शासनाची सेवा करून एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला अशी वागणूक देत असतील तर लोकाभिमुख प्रशासक म्हणून कशाला उहापोह करतात असा सवालही त्यांनी आपल्या निवेदनात केला आहे. दरम्यान, सद्य परिस्थितीची चौकशी करून आले प्रलंबित प्रवास भत्ते बिलांचे अनुदान देण्याची मागणी त्यांनी करत ती न दिल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा प्रमोद केरकर यांनी दिला आहे.