
कणकवली : कणकवली शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मराठा मंडळ येथील क्रिस्टल रेसिडेन्सी या बिल्डिंग मधील आठ ते दहा फ्लॅट फोडली आहेत. चोरीची माहिती समजतात पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तसेच नगरसेवक सुशांत नाईक यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली भर वस्तीमध्ये पहाटे साडेतीन च्या सुमारास झालेल्या घटनेमध्ये नागरिक धास्तावले आहेत. चोरी करताना काही नागरिकांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्यांच्यावर हल्ला केला व पळून गेले अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली