
दोडामार्ग : कुडासे वानोशी - धनगरवाडी येथे माजी सरपंच पुजा बाळाजी देसाई यांच्या घरा शेजारी 5 दिवसांपूर्वी विद्युत पोल वर झाड पडल्याने मोडून पडला विजवितरण ला कळवून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विजवितरणचा भोंगळ कारभार थांबणार तरी कधी असा प्रश्न कुडासे येथील ग्रामस्थांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ पोल व लाईन बाजूला न केल्यास विजवितरणला घेराव घालू असा इशारा माजी सरपंच पूजा देसाई यांनी सांगितले आहे.
कुडासे वानोशी धनगरवाडी मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत पोल लाईन व वाय -फाय केबल यांच्यावर झाडं पडल्यामुळे विद्युत पोल मोडून पडला आहे. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. कृपया विद्युत वितरणाने लवकरात लवकर हे पोल उभे करावे व लाईट चालू करण्यात यावी अशी विनंती येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की विद्युत लाईच्या पोल वर नेट केबल घातली आहे ती केबल खाली असल्याने ती वाहनाना लागते त्यामुळे ही अपघात होतात केवळ केबल मुळे हे पोल मोडतात. त्यामुळे याचाही विद्युत वितरण ने विचार करावा व विजेचा खेळखंडोबा थांबवावा.