डिगस इथं घरावर खांब कोसळल्याने किरकोळ नुकसान...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 29, 2023 19:17 PM
views 223  views

कुडाळ : डिगस येथे घरावर विद्युत सिमेंट खांब व घरा समोर झाड कोसळल्याने किरकोळ नुकसान झाले आहे. डिगस करिवणे टेंब येथील कृष्णा सखाराम पवार यांच्या घरा समोर आंब्याचे झाड व घरावर विद्युतवहिनीचा सिमेंट खांब कोसळला आहे. यात विद्युत खांब घरावरील कौलारू छपरावर कोसळल्याने किरकोळ नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने घरात असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही.

सकाळपासूनच कुडाळ तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले. अचानक पाऊस व वाऱ्यामुळे विद्युत खांबासह झाड कोसळल्याने सकाळपासून खंडित झालेला विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत करण्यात आलेला नाही. घटनास्थळी डिगस गावच्या सरपंच पूनम पवार, डिगस पोलीस पाटील सुधीर राठोड, घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र उशिरापर्यंत  तलाठी, व ग्रामसेवक दाखल न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.