कलमठ मधील एकाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 10, 2023 20:50 PM
views 1110  views

कणकवली : तालुक्यातील कलमठ मधील बीडयेवाडीत एका इमारतीच्या खाली एका स्थानिक 48 वर्षाच्या व्यक्तीने पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण  यावेळी शेजारीच असणारे एकाने  त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले व तत्परतेने पोलिसांना फोन केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस त्याला व त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन आले आहेत. नेमके आत्महत्येचे कारण काय हे समजू शकले नसले तरी  तो कलमठ मध्ये स्थानिक व्यक्ती असल्याचे समजत आहे. आणि त्याने पेट्रोल आपल्या हातावर  ओतून घेतल्याने त्याचा हातही भाजला आहे.