खैराची झाडे तोड प्रकरणी तळवडेतील एकास अटक

Edited by: विनायक गावस
Published on: July 09, 2023 15:15 PM
views 291  views

सावंतवाडी : खैराची झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याने तळवडे येथील एकाला सांगे-दक्षिण गोवा येथे अटक करण्यात आली आहे. सिकंदर चंद्रकांत मालवणकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याला सांगे येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबतची माहिती अशी की, सांगे येथील वन विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० झाडांसह झाडे कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास सांगे वनक्षेत्रपाल विक्रमादित्य गावकर करीत आहेत.