
कणकवली : सध्या सर्वत्र ठिकाणी विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. सतत होणाऱ्या वारंवार वीज पुरवठा खंडित मुळे विद्युत उपकरणांवर परिणाम झालेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या नळ पाणी योजना पुरवठा असतील त्याचप्रमाणे दीड महिन्यावर आलेली श्री गणेश चतुर्थी निमित्त गणपती शाळा रात्रंदिवस सुरू आहेत. अशावेळी वारंवार होणारा वीस पुरवठा खंडित मुळे वीज ग्राहक पुरता हैराण झालेला आहे. तसेच पावसाळ्यात मच्छर मोठ्या प्रमाणात होत असते अशा वेळी रात्री लाईट गेल्यावर विज ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
आज सोमवारीच वीज ग्राहकांनी वीज मंडळ नांदगाव येथील कार्यालयाला भेट दिली असता सदर विद्युत अभियंता कर्मचारी विद्युत लाईनवर काम करण्यासाठी गेले होते या वीज ग्राहकांनी बंद दरवाज्याला वारंवार वीज पुरवठा खंडित मुळे नोटीस चिकटण्यात आले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, तोसीम नावलेकर, पांडू तेली, अनिल बांदेकर, अझरुद्दीन कुणकेरकर,हुसेन नावलेकर, सय्यद साठविलकर ,मैनुद्दीन नावलेकर, तंजील नावलेकर, सैजाद साठीलकर, अकीब नावलेकर आदी विज ग्राहक उपस्थित होते.