
कणकवली : १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात आमदार नितेश राणेंनी निवडणुकीआधीच ठाकरे सेनेला हादरे द्यायला सुरुवात केली आहे. आ.नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीचे कट्टर समर्थक असलेल्या कणकवली पं स चे माजी सभापती कै. प्रमोद सावंत यांचे चिरंजीव ऍड. प्रसाद सावंत, कासरल गावच्या माजी सरपंच सुवर्णा सावंत,कासरल सोसायटी उपाध्यक्षा नेहा सावंत, ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र कोकम, युवासेना शाखाप्रमुख दीपक कुळये यांच्यासह गावातील प्रमुख ठाकरे सेना कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. ओम गणेश बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेशावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, माजी उपसभापती महेश गुरव, दिलीप तळेकर, जिल्हा बँक संचालक ऍड. समीर सावंत, भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.