
कणकवली :आमदार नितेश राणे हे बुधवारी रात्री 11 वाजता देवगडवरून कणकवलीकडे येत असताना नांदगाव तीट्याच्या अगोदर बाईक अपघातात जखमी झालेल्या आणि मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणाला आपल्या गाड्या थांबवून स्वतः खाली उतरून आमदार नितेश राणे यांनी मदत केली. अपघातग्रस्त तरुणाला आपल्या ताफ्यातील गाडीतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघातग्रस्तांना मदत करा असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येते. आमदार नितेश राणे यांनी एका अपघातग्रस्ताला मदत करून एक आदर्श उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले आहे.