बावळाट श्री सातेरी माऊली मंदिर येथे नवीन मोठा पूल उभरणार

नवीन पुलासाठी रू.२.४० कोटींचा निधी मंजूर
Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 15:26 PM
views 145  views

सावंतवाडी : बावळाट-केसरी मार्गावरील श्री सातेरी माऊली मंदिर येथील सद्यस्थितीस मोडकळीस आलेल्या पुलावर नव्याने मोठा पूल बांधण्यास रू.२.४० कोटींचा निधी सध्या पार पडत असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बजेटच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे. याबाबतची माहिती माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिली आहे.बावळाट ग्रामस्थांची आग्रही मागणी पूर्ण केल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार त्यांनी मानले आहेत.