तांबळडेग येथे रंगला संगीतमय जलसा !

सागर वाचनालयाच्या 94 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 29, 2022 17:28 PM
views 331  views

देवगड : तांबळडेग येथील सागर वाचनालयामध्ये नेहमीच विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न असतो, असे वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर भगवान नेरागी यांनी 94 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सांधिक स्पर्धा आणि संगीत जलसा, उद्‌घाटन प्रसंगी सांगितले. प्रारंभी रश्मी रविंद्र कांदळगावकर यांच्या स्वागतगीताने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी चमचा गोटी, डोळ्यावर पट्टी बांधून मडके फोडो, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात प्रथम हर्षिदा शिवचंद्र धुरी, द्वितीय आर्यन मोहनदास प्रभू यांनी क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रभारी मत्स्यव्यवसाय अधिकारी रत्नाकर राजम, सामाजिक कार्यकर्ते सुभान कोळंबकर, रविंद्र कांदळगावकर, संस्थेचे सचिव रामचंद्र सारंग, सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निवतकर, उपाध्यक्ष प्रभाकर राजम आदीमान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रथम वर्धापन दिनापासून चालत आलेल्या परंपरेनुसार 'संगीत जलसा' या संगीतमय कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर तथा दाजी राजम, नितीन कोळंबकर रश्मी कांदळगावकर, पद्माकर राजम, श्रीकृष्णा राजम, वर्षा राजम, आदीनी जुन्या नव्या गीतांचा समन्वय साधून गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी पांडुरंग कोळंबकर, विष्णू निवतकर, चंद्रशेखर उपानेकर, शंकर भाबल, विलास सनये,  विशाल कोळंबकर, जीजी कोचरेकर, गंगाराम निवतकर, विद्याधर राजम, नाना निवतकर, शुभम धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

समृध्दी भुरी, माधवी प्रभू, आकांक्षा सारंग, तृप्ती कोळंबकर यांनी आकर्षक रांगोळी रेखाटल्याने लक्ष वेधून घेतले. संगीतमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार विष्णू धावडे यांनी केले.